HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी भारुड आंधळा पांगळा
भारुड - भूत जबर मोठे गं बाई


भारुड - भूत जबर मोठे गं बाई

30GOOG
भारुड - भूत जबर मोठे गं बाई

भूत जबर मोठे गं बाई ।
झाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥
झाली झडपड करूं गत काई ।
सूप चाटूचे केले देवऋषी ॥
या भूताने धरिली केशी ॥ २ ॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥ ३ ॥
भूत लागले नारदाला ।
साठ पोरे झाली त्याला ॥ ४ ॥
भूत लागले ध्रुव बाळाला ।
उभा अरण्यात ठेला ॥ ५ ॥
एका जनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥ ६ ॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-06T08:08:44.0000000Z

Comments | अभिप्राय