HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
डाका सुंदरे चिद्‌‍घने माझे र फकीर सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे
एडका - एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ...


भारुड - एडका

30GOOG
भारुड - एडका

एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥
धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥ १ ॥
धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा ।घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥ २ ॥
भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गति झाली वालीसी ।
विश्वामित्रासारिखा ऋषि । नाडिलाजेणे । तो केवळ पंचानन ॥ ३ ॥
शुकदेवानी ध्यान धरोनी ।एडका आणिला आकळो नि ।
एका जनार्दनी चरणी । बांधिला जेणे ।तो केवळ पंचानन ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2010-08-31T08:02:26.5007400-04:00

Comments | अभिप्राय