HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड गौळण वारीयाने कुंडल हाले । डोळ भारुड होळी देहचतुष्ट्याची रचोनि होळी
भारुड - गौळण - असा कसा देवाचा देव बाई ठक...


भारुड - गौळण

30GOOG
भारुड - गौळण

असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा ॥ धृ. ॥
गवळ्याघरी जातो । दहीदूश चोरूनी खातो। करी दुधाचा रबडा ॥ १ ॥
शिंकेची तोडितो । मडकेचि फोडितो । पाडी नवनीताचा सडा ॥ २ ॥
वाळवंटी जातो । कीर्तन करतो । घेतो साधूसंतांशी झगडा ॥ ३ ॥
एका जनार्दनी । भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T05:35:34.0000000Z

Comments | अभिप्राय