HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जागल्या रात्रंदिवस घोकितो तुम्ही भारुड जंगम भाव तोचि भगवा चिरा । मुळ
भारुड - जागर - हरिजागरणी दिवस आनंदे सौरस...


भारुड - जागर

45GOOG
भारुड - जागर

हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे ।
गावया उल्हास वैष्णवासी ॥ १ ॥
गाता पै नाचता तया जाला पै बोधु ।
त्यामाजी गोविंदु क्रीडतसे ॥ २ ॥
चला चला रे भाई हरिजागरा वेगी ।
वैष्णव हे रंगी नाचताती ॥ ३ ॥
स्वानंदे लवलाह्या उभवोनी श्‍सात्विका बाह्या ।
आलिंगू कान्ह्या अष्टभावी ॥ ४ ॥
दुजेपणाविण खेव पडिलेंस्शे मिठी ।
सांगणे पुसणे गोष्टी हारपली ॥ ५ ॥
यापरि वैष्णव रंगी करिताती आल्हाद ।
उसळला आनंद साठवेना ॥ ६ ॥
एकाएकी हो मिनला जनार्दन ।
तेणे सुखे मना उमजु नाही ॥ ७ ॥
Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T05:41:29.0000000Z

Comments | अभिप्राय