HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जागर हरिजागरणी दिवस आनंदे सौरस भारुड जोगवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी
भारुड - जंगम - भाव तोचि भगवा चिरा । मुळ...


भारुड - जंगम

45GOOG
भारुड - जंगम
भाव तोचि भगवा चिरा ।
मुळीचा तंतू शिव दोरा ।
आत्मलिंग पूजू बरा ।
मी आलो तुझिया द्वारा बापांनो ॥१॥
गुरुधर्म कोरान्न भिक्षा ।
परात्पर आमची दीक्षा रे बापांनो ॥धृ. ॥
देहदंड काठी हाती ।
आशा जाळुनी लाविल्या विभूती ।
दया क्षमाआणि शांती ।
आम्ही जंगम ऎशा रिती रे बापांनो ॥२॥
हरिनामाच्या घालुनि माळा ।
गुरुदीक्षेचा सोहळा ।
साधुसंत जाणती कळा ।
एका जनार्दनी भॊळा रे बापांनो ॥३॥
Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T05:58:10.0000000Z

Comments | अभिप्राय