HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जोहार जोहार मायबाप जोहार । मी न भारुड जोशी आम्ही अलक्षपुरीचे जोशी ।
भारुड - जोशी - येथुनि पुढे बरें होईल । भ...


भारुड - जोशी

30GOOG
भारुड - जोशी

येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौर्‍यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥
मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३।
एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्‌गुरुंसी । फेर चुकवा चौर्‍याऎंशी ॥४॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T06:00:22.0000000Z

Comments | अभिप्राय