HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जोशी येथुनि पुढे बरें होईल । भ भारुड जोशी माझा शकुन ऎका भाई । चार व
भारुड - जोशी - आम्ही अलक्षपुरीचे जोशी । ...


भारुड - जोशी

45GOOG
भारुड - जोशी

आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकतीचौर्‍याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥
होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥
नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध रहा दादांनो ॥२॥
वासना वाईट ही बा थोर । पुरविले लहान थोर ।
फिरतीचौर्‍याऎंशी लक्ष घर । पडाल फशी दादांनो ॥३॥
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी ।
रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ॥४॥
Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T06:01:43.0000000Z

Comments | अभिप्राय