HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जोशी आम्ही अलक्षपुरीचे जोशी । भारुड अष्टपदी वांकडा म्हणे कृष्णजी बापा
भारुड - जोशी - माझा शकुन ऎका भाई । चार व...


भारुड - जोशी

30GOOG
भारुड - जोशी

माझा शकुन ऎका भाई । चार वेद देती ग्वाही ।
सहा शास्त्रेंवदती पाही । तेचि धरूनी रहा ॥ १ ॥
सावध नाना सावधनाना । समज काही तरी धरी मना ॥ध्रु॥
नका जाऊ आडवाटे । तेथे लागती चपेटे ।
दात विचकुनी पडसी नेटे । उगेच पहा ॥२॥
गेले सरले मागील फेरे । आता दिवस आले बरें ।
विघ्न नाहीसे जाले सारे । सावध रहा ।३॥
एका जनार्दनींचा जोशी । होरा सांगतो संताशी ।
ऎकता जातील मोक्षच दासी ।
नायकता पडतीलचौर्‍याऎंशी । हेचि पहा ॥४॥
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-24T06:02:38.0000000Z

Comments | अभिप्राय