HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड अष्टपदी वांकडा म्हणे कृष्णजी बापा भारुड भटीण मी भटीण आलें रे भटा । नको
भारुड - भटीण - अगे ऐके भटणी । कां बोलसी ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - भटीण

अगे ऐके भटणी । कां बोलसी चावटनी । जन्मांतरी पाळिलें म्हणोनि । उपकार फेडिसी ॥ १ ॥

काय बोललीस बोल । अवघा सारा फोल । अंगीं नाहीं भक्तीची बोल । भटणी तुझ्या ॥ २ ॥

कामक्रोध माजली । विषयानें भुलली । गुरुकृपा नाहीं जाली । भटणी तुजला ॥ ३ ॥

अहंकार सोडोनी देई । सद्‍गुरूसी शरण जाई । भक्तिसुखें तूं राही । हो भटणी ॥ ४ ॥

भट बोलला बोली । भटणीची अहंता गेली । भटणी ती स्थिर जाली । एका जनार्दनाचे पायीं ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T04:03:53.0000000Z

Comments | अभिप्राय