HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड कुंटीण सद्‌गुरुमाय कुंटीण झाली म भारुड लग्न एका जनार्दनाचे लग्नसिद्धी
भारुड - कुत्रें - ये रे कुत्तु ये । आम्हां ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - कुत्रें

ये रे कुत्तु ये । आम्हां विटाळ करूं नको । आपली भाकर घे । दे रे धन्या दे । विटाळ राहिला तुज खालीं । आवरून आपला घे । आतां हें कुत्रें मातलें । मीच म्हणूनी गुंतलें । फार कूस मोठी केली । जीवी तुझी खोटी झाली । उपाशीं मरतों पाहीं बरे । अमृताचें सारें । घर एक सकाळ काय खासी । तूंच मुद्दल कोठें राहसी । एवढे ज्ञान झालें कोठें । सद्‍गुरूचें देणें मोठें । सद्‍गुरु तुला आहे का रे । सर्वांघटी तोच कीं रे । आम्ही तर म्हणतों कुत्रा तुला । अविद्येनें धतोरा दिला । ब्राह्मणाशीं अविद्या म्हणशी । देहें ब्राह्मण कैसा होशी । श्रेष्ठ जन्म वेद बोलती । येवढे भले तरी कां मरती । हरिभक्त अमर होती । तें कळें कैसें । आपण व्हावें तैसें । होईनासी कां रे । जात गोत पाहिनाशी कीं रे । हें तुला ज्ञान कशानें झालें । एका जनार्दनीं गुरुकृपें कळों आलें ॥ १ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T04:44:32.0000000Z

Comments | अभिप्राय