HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पिंगळा डुग डुग डुग डुग । डुगडुगो भारुड रहाट हुंडगी निघाली बाजारा । बा
भारुड - पोपट - पढो माझ्या आत्मारामा । रा...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - पोपट

पढो माझ्या आत्मारामा । राधा कृष्णाचें हे ध्यान । पिंजर्‍यामध्यें गुंतलासीं । तुज सोडवील कोण ॥ध्रु०॥

चौर्‍यांयशी लक्ष योनी । वनीं तूं तरी हिंडसी । प्रमदा विष फळीं अति त्वरें धांव घेसी । घेऊनियां दोही पक्षी । पाहती तुज न्यावयासी ॥ १ ॥

पिंजरा घडविला पंचभूतांचा कुसरी । नव द्वारें सोळा सांधे । प्रभा पडली भीतरीं । लाविली प्राचीनाची दोरी । बांधिला निज मंदिरीं ॥ २ ॥

हिरवा तुझा रंग । गुंज वर्ण दोन्ही डोळे । चोंच आहे तुझी लाल । बोल तुझा हा मंजुळ । राघवा तूं बोल माझ्या सख्या अमोलिक बोल ॥ ३ ॥

अचळ तूं चंचळ मोठा हिंडे तीनही ताळ । तुला जपला काळ । बोका केव्हां घालिल गळ । जरी जाशी उडोनियां । पूर्व सुकृताचें फळ ॥ ४ ॥

सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र तुज देई । तोच तुला सोडवील । यम करील काई । पावशील चिंतामणी । एका जनार्दनीं पायीं ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:12:07.0000000Z

Comments | अभिप्राय