HOME|mr|sahitya|bharude|
भारुड शंखीण डंखीण बाहात्तर कोटी कात्यायनी । भारुड शिमगा सत्त्व गांठीं उमगा । तेणे
भारुड - शंखीण डंखीण - हाट करूनि घरासी आणली बैसल...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - शंखीण डंखीण

हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे ॥ १ ॥

शंखीण बाबा डंखीण । त्या घरी शंखीण बाबा डंखीण रे ॥ध्रु०॥

चौ शेरांचा वरणभात केला वर भाजीचा गोळा रे । मोठे मोठे घास घेती भुरळ फिरवी डोळा रे ॥ २ ॥

आठ भाकरी बारा पोळ्यां धिरडी खादली सोळा रे । पाणी पिउनी ढेकर दिला मराठी तिचा मोळा रे ॥ ३ ॥

बारा सोळा लुगडीं नेसली येइना पाठिपोटीं रे । नव खणांची चोळी शिवली उराशीं येईना गाठीं रे ॥ ४ ॥

एका जनार्दनीं म्हणे बाबा ऐशी बाइल केली रे । तिच्या भयानें सर्व पळूनियां गेली रे ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T15:08:28.0000000Z

Comments | अभिप्राय