HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड सौरी हुली गाय हुली शिंगें वासर भारुड सौरी जातिभ्रष्ट जाली सौरी हिंड
भारुड - सौरी - सहा दादुले केले परि म्यां...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - सौरी

सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । काया वाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ १ ॥

सौरी झालें सौरी सखेबाई झालें त्याची नवरी ॥ध्रु०॥

नग्न होउनि भोगिला पुरुष म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । देतो गोड गोड खाया परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ २ ॥

केला संसार गोड परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । याचे मनाची पुरविली खोड परि म्यां ऐसा नाही देखिला दादुला ॥ ३ ॥

ऐसी सौरी झालें परि म्यां नाहीं देखिला दादुला । एका जनार्दनीं नमिलें पायीं ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T15:25:39.0000000Z

Comments | अभिप्राय