HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड सौरी सांड रांड गमजा नको करूं ब भारुड सौरी होउनी स्वैरी लुगडें फेडी
भारुड - सौरी - न करी वो चाळा स्वैरीचिया ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - सौरी

न करी वो चाळा स्वैरीचिया बोला । वेधला जीव निसंगपणें खाती नवा गोळा ॥ १ ॥

ऐसे नव्हे भले कोणा मानवले । जग जगीं हांसती मोडिताती डोळे ॥ २ ॥

फुकटचि संग स्वैरीयेचा बरा । दिवाण दारीं फजिती थोरी वहातसे वारा ॥ ३ ॥

पडलें मोकळें ढुंगण आतां कैसा संग । मागें पुढें फजिती झाली अठरा झाले दंग ॥ ४ ॥

एका जनार्दनीं स्वैरी झाली संतपाय धरा । नाहीं तरी उभ्या बाजारीं फजितीचा थारा ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T15:28:41.0000000Z

Comments | अभिप्राय