HOME|mr|sahitya|bharude|
भारुड  व्यापार त्रैलोक्याचा स्वामी जनार् भारुड बाहुलें शिळा तांब्याचे बाहुलें के
भारुड - आडबंग - आडबंग आडबंग । सदा विषयामध...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - आडबंग

आडबंग आडबंग । सदा विषयामध्यें दंग । मदमस्त डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडून झाला निःसंग ॥ १ ॥

बैसे वेश्याघरीं जाऊन । तिशीं करी हास्यवदन । स्वकरें विड्या देऊन । वेश्या करी त्याचें छळण गा ॥ २ ॥

ज्ञान नाहीं मूढ तो जन । स्वस्त्री टाकून । उकिरडा ओतीरे रतिरेतजन । आपुली स्त्री नेली मांगनं गा ॥ ३ ॥

त्याचें न पाहावें काळें वदन । पशु गाढवासमान । नरतनु व्यर्थ बुडवून । नाहीं साधिलें साधन गा ॥ ४ ॥

मागें केलें देई टाकुन । करी हरींचें चिंतन । येणें साधिलें बहु साधन । केला जामीन जनार्दन ॥ ५ ॥

N/A
Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T15:41:03.0000000Z

Comments | अभिप्राय