HOME|mr|sahitya|bharude|
भारुड आडबंग आडबंग आडबंग । सदा विषयामध भारुड भूत पिता सांगे पुत्रासी । बाळ
भारुड - बाहुलें - शिळा तांब्याचे बाहुलें के...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - बाहुलें

शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना आलें तें नाम ठेविलें ॥ १ ॥

या जनासी लागलें वेड ॥ध्रु०॥

शुद्ध पाण्यानें प्रक्षाळीलें । गंध फुलानें झाकोळिलें । धूप दाऊनि दीपें उजळिलें । पुढें अन्न ठेवूनि चाळविलें ॥ २ ॥

घेरे घेऊनि भोवंडिलें । आडवे पडोनी दंडवत केलें । आपपर नाहीं देखिलें । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T15:42:15.0000000Z

Comments | अभिप्राय