HOME|mr|sahitya|bharude|
भारुड कोडें कृष्णा नवल कैसी परी । तूं भारुड कोडें अबाबाबा बायको मोठी । घेतल
भारुड - कोडें - आम्ही नवल देखिलें भाई । म...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - कोडें

आम्ही नवल देखिलें भाई । मुंगीनें हत्तीशीं केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरीं खातसे ॥ १ ॥

सांगा आमुचें कोडें । लांडग्यासाठीं शेळी रडे । कोल्हे हांसतसे बापुडें । उंदीर रेडे खेळती ॥ २ ॥

वरले गांवींचा एक हत्ती । नित्य खातो प्रजापती । सिंह तया येतो काकुळती । हंस रुसे कागाप्रती ॥ ३ ॥

एका जनार्दनाचें कोडें । उगवी तोचि जाणा वेडे । शहाणे त्यासी नुमगे गाढें । अर्थ पहातां चुके लिगाड ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:36:29.0000000Z

Comments | अभिप्राय