HOME|mr|sahitya|bharude|
भारुड नवल एक नवल देखिलें । एका चोरा भारुड नवल नसोनि नवल असती अबला । करि
भारुड - नवल - मूळ नाहीं शेंडा । काय म्ह...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - नवल

मूळ नाहीं शेंडा । काय म्हणावें त्या गुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रें भांडती खंड विखंडा ॥ १ ॥

नवल जहालें बाई । पाणियानें विस्तव पेटला कोणा सांगावें काई ॥ध्रु०॥

शून्य होतें आधीं तेथें जाहलें एक । एक पाहतां दोन जहाले अलक्ष लक्ष देख ॥ २ ॥

पुरुष नाहीं स्त्री नाहीं नाहीं कांहीं आकार । पहातां पाहाणें बुडोनि गेले तेथें कैंचा निराकार ॥ ३ ॥

ब्रह्मज्ञान घरोघरीं कोण तया पुसे । शरण एका जनार्दनीं नाम गातसे ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:41:09.0000000Z

Comments | अभिप्राय