HOME|mr|sahitya|bharude|
भारुड नवल मोकळी असोनि गुंतली खेळा । भारुड नवल नवलाचें नवल आज म्यां देखि
भारुड - नवल - आम्हीं नवल देखिलें । कान्...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


30GOOG
भारुड - नवल

आम्हीं नवल देखिलें । कान्होबा तुज लागे बोले ॥ १ ॥

कैशी नवलाची मात । म्हातारी ती तरणी होत ॥ २ ॥

अमावस्येच्या दिवशीं चंद्र देखिला । राहू केतु येउनी ग्रहणीं लागला ॥ ३ ॥

आपुलेनि मनें आकाश पोळलें । अकस्मात जाऊनि समुद्रीं नाहालें ॥ ४ ॥

समुद्रांतील आटलें पाणी । एका जनार्दनीं जहाली कहाणी ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T16:47:58.0000000Z

Comments | अभिप्राय