HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पाळणा खर खर मुंड आवरे फकीरा । प भारुड पाळणा सद्गुरुवचनें जन्म जें झाल
भारुड - पाळणा - जो जो जो जो रे रघुनामा । ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - पाळणा

जो जो जो जो रे रघुनामा । निज बाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुम्ही ॥ध्रु०॥

जोगी दिसतसे विचित्र । त्याला तीन नेत्र । चर्मावेगळें नाहीं वस्त्र । म्हणवितो तुझा मित्र ॥ १ ॥

अंगीं लावुनियां विभुती । अर्धांगी पार्वती । वृषभारूढ तो पशुपती । त्रिशुळ डमरू हातीं ॥ २ ॥

आणिक नवल दयाळा । कंठ दिसे निळा । मस्तकीं गंगा वाहे झुळझूळा । नेत्री अग्निज्वाळा ॥ ३ ॥

भस्म चर्चुनी सर्वांगीं । वेष्टिला भुजंगीं । भूतें मेळवूनियां बहु जगीं । आलासे प्रसंगीं ॥ ४ ॥

जोगी आलासे अंगणीं । तुळशी वृंदावनीं । तुजला देखूनियां नयनीं । घाली लोटांगणीं ॥ ५ ॥

गोकुळीं जन्मलें निधान । जगदीश तो जाण । त्याचे चरणीं शरण । एका जनार्दन ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:46:54.0000000Z

Comments | अभिप्राय