HOME|mr|sahitya|bharude|
भारुड पाळणा सद्गुरुवचनें जन्म जें झाल भारुड अर्ज अर्जदस्त अर्जदार । बंदगी
भारुड - अभयपत्र - अभयपत्र जिवाजीपंतास । कळा...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - अभयपत्र

अभयपत्र जिवाजीपंतास । कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं ।

ऐशी तुम्ही लिहून कळविली । तेणेंकरून धन्यास फार संतोष जाहला ।

जाणोन धन्यानें तुमचे गांवचे आबादी करितां । ज्ञानवैराग्यासह शांति क्षमा दया हे ताबडतोब रवाना केलें ।

मौजे मजकुरी पावतांच यांचा अंगिकार करून वहिवाट सुरू करणें । या कामीं कोणाची हरकत धरूं नये ।

मागाहून स्वधर्मपंताची स्वारी येणार आहे । तुम्ही आपुले हुशारींत राहणें । लिहिलेप्रमाणें वर्तणूक ठेवणें ।

एका जनार्दनीं शरण । हें अभयपत्र दिलें । सही ॥ १ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T18:51:38.0000000Z

Comments | अभिप्राय