HOME|mr|sahitya|bharude|
भारुड अर्जदस्त अर्जदस्त अर्जदार बंदगी । भारुड थाक थाक रे थाक तुज नाहीं रे उ
भारुड - विनंतीपत्र - श्रीमंत महाराज राजमान्य स...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - विनंतीपत्र

श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुणसंपन्न सकल वेदसंपन्न । शास्त्रसंपन्न ।

आत्मारामपंत वास्तव्य देह शरीर । चरणसेवेसी । जिवाजीचा साष्टांग नमस्कार ।

आपण कलमी पत्र दर्शविलें त्या प्रमाणें गांवची वहिवाट चालूच आहे ।

मध्यंतरीं गांवची रयत नायकेल तर इलाज नाहीं । ज्याचे ते आपआपले धर्माप्रमाणें वागतात ।

पुराण श्रवण । मनन । निदिध्यास । अर्चन । वंदन । दास्यत्व । पादसेवन ।

हेही आपआपल्या धर्माप्रमाणे चालू आहेत । यांत अधर्म कोणता होईल तो साहेंबांस लिहून कळवूं । एका जनार्दनी शरण ।

हें विनंती पत्र ॥ १ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:01:48.0000000Z

Comments | अभिप्राय