HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड थाक थाक रे थाक तुज नाहीं रे उ भारुड अभयपत्र समस्त राजकार्य धुरंधर । व
भारुड - टिळा - माझा टिळा माझा टिळा । धाक...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - टिळा

माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळी घातला कीं ॥ १ ॥

टिळ्यानें दाविलें कैलास । केला गंधर्वाचा नाश । धाक दरारा इंद्रचंद्रास । सुख लागलें तेव्हां ध्रुवास ॥ २ ॥

हा टिळा कोणाचा जाणे हा टिळा शुद्ध चैतन्य नीतीनें । महत विष्णु म्हणती जाणें । हा टिळा रेखिला यानें ॥ ३ ॥

माझ्या टिळ्यापासून । आकाश पाताळ कैलास । तत्पर असेल त्यांत कोण । सुंदर सगुण निरूपण ॥ ४ ॥

हा टिळा शोधून जातां । न ये ब्रह्मादिकांच्या हाता । त्याला नाहीं मातापिता । मग कैंचा काका चुलता ॥ ५ ॥

ह्या टिळ्याची ऐका खूण । विरंची करी ध्यान । ज्यापासून झाला उत्पन्न । केलें वेदाचें खंडण । चारी मुक्ती साधिल्या त्यानें ॥ ६ ॥

टिळ्या तुला नाहीं हात ना पाय । टिळा स्वरूपी राहे । एका जनार्दनीं ध्याये । माझा टिळा ॥ ७ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:10:34.0000000Z

Comments | अभिप्राय