HOME|mr|sahitya|bharude|
भारुड अर्जाचा जाब क्षत्रिय कुळवंत । श्रीअयो भारुड जोहार कां रे महारा बदमस्ता । का
भारुड - जोहार - मी निर्गुणपुरीचा महार । क...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - जोहार

मी निर्गुणपुरीचा महार । करितों जोहार ॥ १ ॥

पाटीलबाबा तुमचे वस्तींत । पाटलिणीनें केलें बदमस्त ॥ २ ॥

तुमची रयत फिरली सारी । गांवचे बदलले कारभारी ॥ ३ ॥

आतां तुमचे नाहीं बरें । चौर्‍यांयशी लक्ष फिराल फेरे ॥ ४ ॥

एका जनार्दनीं महार । पायापाशीं केला जोहार ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:40:42.0000000Z

Comments | अभिप्राय