HOME|mr|sahitya|bharude|
भारुड जोहार मी निर्गुणपुरीचा महार । क भारुड जोहार देहपूरचें दिले ठाणें । जि
भारुड - जोहार - कां रे महारा बदमस्ता । का...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint. 

30GOOG
भारुड - जोहार

कां रे महारा बदमस्ता । कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां । तुझे बापाचें भय काय । मायबाप तुमचें आमचें एकच हाय । ऐक ऐसें बोलूं नको ।

निर्गुणापासून अवघें झालों । निर्गुण तुला काय ठावें । आत्मस्वरुपीं शोधून पहावें । आत्मस्वरूप आम्हां कळेना । नाहीं तरी संतांशीं शरण जा ना । संतांशीं गेल्यानें काय होतें । चौर्‍यांयशीचा फेरा चुकतो । हें ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झालें । एका जनार्दन प्रसादें कळूं आलें ॥ १ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:43:28.0000000Z

Comments | अभिप्राय