HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जोहार घ्या जोहार घ्या जोहार । म भारुड जोहार जोहार मायबाप जोहार । मी स
भारुड - जोहार - महार बोलतो बोला । तुम्ही ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - जोहार

महार बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला । शत वर्षांचा नेम भरला । आतां हुशार राहा की जी मायबाप ॥ १ ॥

येईल यमाजीची चिठी । बोलूं नेदी जाल उठाउठी । वोंगळवाणी कराल दिठी । कोण सोडविणार की० ॥ २ ॥

कांहीं तरी हित करा । कामक्रोध परते सारा । नामस्मरण लक्ष धरा । हाचि विचार करा की० ॥ ३ ॥

मागील बाकी अवघी झाडा । नाहीं तरी पायीं पडेल खोडा । बसावयाचा तुमचा घोडा । राहील घरचा घरीं की० ॥ ४ ॥

शरण एका जनार्दनीं । माय बापा संत धनी । लक्ष लावा त्यांचे चरणीं । हाचि विचार करा की जी मायबाप ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:47:26.0000000Z

Comments | अभिप्राय