HOME|mr|sahitya|bharude|
भारुड जोहार जोहार मायबाप जोहार । मी स भारुड जोहार ऐका ऐका पाटीलबोवाजी । गां
भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी व...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - जोहार

जोहार मायबाप जोहार । मी विठु पाटलाचा महार । हिशोब देतों ताबेदार । लंकेचा कारभार की जी मायबाप ॥ १ ॥

आवाजीकडून येतों । अर्धी भाकर मागून खातों । सारी रात्र गोवरापाशीं जागतों । फरमासी करतों की जी मायबाप ॥ २ ॥

पाटलाचा नांगर शेट्याची तागडी । आईबाईची बांगडी । आंत माझी पांचांची घडामोडी । करितों की जी मायबाप ॥ ३ ॥

येथें कुळकर्णी स्वाधीना करा । गांवचा हिशोब पाहिजे बरा । धन्याची रजा तलबेप्रमाणें मुशारा । ये चित्तांत की जी मायबाप ॥ ४ ॥

ब्रह्मानंदीं केला जोहार । एका जनार्दन बाजीचे उत्तर । माप केलें खरोखर । काय बोलिजे की जी मायबाप ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:50:01.0000000Z

Comments | अभिप्राय