HOME|mr|sahitya|bharude|
भारुड जोहार जोहार मायबाप जोहार । मी व भारुड जोहार जोहार मायबाप जोहार । मी न
भारुड - जोहार - ऐका ऐका पाटीलबोवाजी । गां...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - जोहार

ऐका ऐका पाटीलबोवाजी । गांव बरा राखा राजी । उद्यां येतील यमाजी बाजी ।

फटफजिती होईल की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार मायबाप धनी । उठा उठा झोप सांडोनी । काळ भरला उरे ना कोण्ही ।

पुढें पडाल काळाचे वदनीं कीं जी मायबाप ॥ २ ॥

गांवांतील रयत स्वाधीन करा । कुलकर्णी आधीं हांतीं धरा । तरीच तुमचा बरा थारा ।

मोडेल कोपट होईल चुरा की जी मायबाप ॥ ३ ॥

कामाजी देशमुख मोठा मस्त । क्रोधाजी नाईक मिळाले त्यांत । मदाजीबोवा त्यासी शिकवीत ।

मत्सर श्वान पुढें भुंकत की जी मायबाप ॥ ४ ॥

दंभाजीची भारी हांव । अहंकारपंताने वोस केला गांव । जिवाजी तुम्ही विसरला धन्याचें नांव ।

या सहा जणांची हाव धरून की जी मायबाप ॥ ५ ॥

आतां तुम्ही विचार करा । मूळचा मार्ग हळुहळु धरा । तेणें चूकेल तुमचा फेरा ।

एका जनार्दनीं तुटेल सारा दोरा की जी मायबाप ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T19:51:26.0000000Z

Comments | अभिप्राय