HOME|mr|sahitya|bharude|
भारुड फकीर दीलका हामने पछानावे । काय भारुड हुशारी हुशियार बंदा हुशियार । ते
भारुड - मेसाबाई - मेसको मैराळ तूं मसणीचे आई...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - मेसाबाई

मेसको मैराळ तूं मसणीचे आई । धांव पाव वेगीं माझें नमन तुझे पायीं ॥ १ ॥

पंढरीचा हनुमान यातें कोण कोड घाली । जाळियेली लंका येणें तोंड केली काळीं ॥ २ ॥

दोंदील गण्या यातें पाचारुनी काई । उंदरावर बैसुनी केव्हां धांवेल आई ॥ ३ ॥

कैलासीचा शंभु बाई आवडेना मना । लागला भिल्लणीपाठीं कोठें पाहूं त्याला ॥ ४ ॥

लक्ष्मीचा वर खोटा आवडेना आम्हां । धरियेली माव तेणें मारियेला मामा ॥ ५ ॥

एक सेला एक मेला एक सिंदिचा घडा । घेऊनियां आई आमुचें उकली तूं कोडा ॥ ६ ॥

इतुकें घेउनी पाव तूं आम्हांसी । एका जनार्दनीं विनवितों तुजसी ॥ ७ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T23:06:49.0000000Z

Comments | अभिप्राय