HOME|mr|sahitya|bharude|
भारुड गोंधळ मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि भारुड गोंधळ स्वर्ग मृत्यु पाताळ त्याच
भारुड - गोंधळ - अनादि अंबिका भगवती । बोध ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - गोंधळ

अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥ १ ॥

गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥ध्रु०॥

व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं । द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥ २ ॥

मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनीं नाचे देख ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T23:49:15.0000000Z

Comments | अभिप्राय