HOME|mr|sahitya|bharude|
भारुड गोंधळ अनादि अंबिका भगवती । बोध भारुड गोंधळ अंबऋषीकारणें गर्भवास सोसि
भारुड - गोंधळ - स्वर्ग मृत्यु पाताळ त्याच...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - गोंधळ

स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चार वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला वो ॥ १ ॥

उदो बोल उदो बोल कृष्णाबाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

जीवशिव संबळ घेउनी आनंदें नाचती वो । अठ्यांयशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥ २ ॥

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो । पुंडलीक दिवटा शोभे वाळुवंटी वो । एका जनार्दनीं अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T23:50:12.0000000Z

Comments | अभिप्राय