HOME|mr|sahitya|bharude|
भारुड अंबा नमो अनादि माया भगवती । मू भारुड महारीण महारणीच्या बोला । लक्ष द्
भारुड - महारीण - महारीण हिंडे गांवांत । पा...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - महारीण

महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावा आहेत झोंपेंते । महारीण बहुतीं फिरत । पाटील झोंपेंत झाले मस्त ॥ १ ॥

मायबाप जोहार । मी सांगतें तें ऐका साचार । तुमची नगरी करा हुशार । आतां येतील यमाजी हुद्देदार ॥ २ ॥

झोंप सांडा आतां उठाउठी । पुढें आली यमाजीची चिठ्ठी । जाब देतां व्हाल हिंपुटी । मारील गांडीवरी जेव्हा काठी ॥ ३ ॥

मायबापाचें न चाले कांहीं । भाऊ बहिणी राहती ठायींच्या ठायीं । सेजेची बायको पुसेना कांहीं । इष्ट मित्र कोणाचे भाई ॥ ४ ॥

जोंवरी तुमचे हातीं आहे । तोंवरी कराल तें होय । आयुष्य सरल्या कराल काय । भोयीं न टेकती पाय ॥ ५ ॥

म्हणोनी येतें काकुलती । धरा धरा सत्संगती । तेणें होईल तुम्हां विश्रांती । एका जनार्दनीं करी विनंती ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T23:55:01.0000000Z

Comments | अभिप्राय