HOME|mr|sahitya|bharude|
भारुड महारीण महारणीच्या बोला । लक्ष द् भारुड महारीण महारीण करिती जोहार । पाटी
भारुड - महारीण - पायां पडत्यें महारीण आली ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

30GOOG
भारुड - महारीण

पायां पडत्यें महारीण आली ॥ध्रु०॥

महारिणीचे बोल ऐका । गांव वसाड पाडूं नका । हकनाक बसेल धक्का । इतुकें तुम्ही मनीं तर्का ॥ १ ॥

ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ । महाकाळाचे हे काळ । मज देखतां गोपाळ । ते मज महारिणीपासोनी ॥ २ ॥

एका जनार्दनीं महारीण झालें । सद्‍गुरूला शरण गेलें । यानें आपुलें स्वहित केलें । जन्ममरण विसरलें ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-11T23:56:54.0000000Z

Comments | अभिप्राय