HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड जागल्या मी जो जांगतों गांव निजला भारुड डौर ऐका गाये साधु सज्जन हो ।
भारुड - जागल्या - उठा उठा मायबाप । नका येऊं...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

45GOOG
भारुड - जागल्या

उठा उठा मायबाप । नका येऊं देऊं झोंप । आली वो आली यमाजीची तलब ॥ १ ॥

तुमचे गांवांत नाहीं पाटीलबावा । पाटलीण आवाचा मोठा दावा । घरचें घरकूल झाकून ठेवा ॥ २ ॥

तुमच्या सुनेची नाहीं वागणूक बरी । तिचे घरधनी मनाजी पाटील थोरी । त्यांच्यातील वाद सार्‍या गांवांत भारी ॥ ३ ॥

पाटीलबावाची ऐकावी थोरी । सहा कारभार करती घरीं । पांच तीं पोरें रडती दारोदारीं ॥ ४ ॥

आतां पाटीलबावा तुम्ही हुशारी धरा । यमाजीबाजी वो येतील घरा । इकडून तिकडे वो नाहीं पळाया ॥ ५ ॥

एका जनार्दनीं कांही हित करा । आपला आपण चुकवा फेरा । जन्ममरणाच्या तोडा येरझारा ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-12T00:09:13.0000000Z

Comments | अभिप्राय