HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड कानोबा पहिले कोठेच नव्हते काही । भारुड कोडे नाथाच्या घरची उलटी खूण ।
भारुड - खेळिया - जनी वनी एक जनार्दन दाता ।...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - खेळिया

जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासी नमन करू आता रे ।

मन उन्मन जयासी पाहता । त्याच्या चरणावरी माथा रे ॥१॥

नाचत पंढरिसी जाऊ रे खेळिया । क्षराक्षरातीत पाहू रे ।

टाळ-मृदुंग मेळवूनि मेळा । गुरुवचनी खेळ खेळा रे ॥ध्रु॥

भक्‍ता वैराग्य कुंडले श्रवणी । ज्ञानांकुश मुकुटमणि रे ।

सप्रेम उटी चंदनाची । सत्वाची कास निर्वाणी रे ॥२॥

अष्टभावे खेळिया खेळताती ठायी । घागर्‍या वाजती पायी रे ।

दया क्षमा दोन्ही चवर्‍या ढाळती । शांती सत्रावी छाई रे ॥३॥

वाद निमाला शब्द खुंटला । त्रिभुवनी आनंद झाला रे ।

एका जनार्दनी शरण गेला । तो एकपण विसरला रे ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:10:14.0000000Z

Comments | अभिप्राय