HOME|mr|sahitya|bharude|
भारुड कोडे नाथाच्या घरची उलटी खूण । भारुड कोल्हाटीण सगुण गुण माया ।  आली कोल
भारुड - कोल्हाटी - सोहं सोहं वाजे ढोल । आमचा...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - कोल्हाटी

सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ ।

परब्रह्म भुलले अकळ । या खेळाचे गुरु जाणे मूळ ॥१॥

ब्रह्मा विष्णू शिवादी साचार । आधी होते निराकार ।

माझे कोल्हाटियाचा प्रकार ॥२॥

खेळे परात्पर ऊपरी । चैतन्याचे महाशिखरी ।

वेळु रोविला श्रीसोहंपुरी । खेळ खेळले नानापरी ॥३॥

आमुचा खेळ पाहुन । निर्गुण ते जाहले सगुण ।

शरण एका जनार्दन । गेला तनु मन विसरून ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:13:24.0000000Z

Comments | अभिप्राय