HOME|mr|sahitya|bharude|
भारुड मांग हयात मायबाप हयात ।  गांव भारुड  नकटी अभावाचे नाक लावुनिया शोभे
भारुड - मुका - मुका झालो वाचा गेली ॥ध्रु...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - मुका

मुका झालो वाचा गेली ॥ध्रु॥

होतो पंडीत महाज्ञानी । दशग्रंथ षड्‌शास्त्र पुराणी ।

चारी वेद मुखोद्‌गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानि ॥१॥

जिव्हा लाचविली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।

निदिले उपान्ना । तेणे पातलो मुखबन्धना ॥२॥

साधू संतांची निन्दा केली । हरिभक्‍तांची स्तुति नाही केली ।

तेणे वाचा पंगू झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:23:26.0000000Z

Comments | अभिप्राय