HOME|mr|sahitya|bharude|
भारुड  नवलाई आता झाले नवलाई ।  पुन्हा भारुड पिसा मायराणी प्रकाशिता दिवा ।
भारुड - पिसा - राम राम म्हणूनी सदा रडे ।...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - पिसा

राम राम म्हणूनी सदा रडे ।

जे जे देखे त्याच्या पाया पडे ॥१॥

देव देखत पिसे पाही ।

आपले पारखे नोळखे काही ॥२॥

बोलामाजि घाली मौनाची मिठी ।

शून्याही वरील सांगतो गोष्टी ॥३॥

आपुलिया माथां आपण मारी ।

त्याच्या पिसेपणा कोण आवरी ॥४॥

एका जनार्दनी पिसा झाला खरा ।

आपुल्या आपण ताशी शरीरा ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:29:47.0000000Z

Comments | अभिप्राय