HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड पिसा मायराणी प्रकाशिता दिवा । भारुड  संसार सांगते तुम्हा वेगळे निघा
भारुड - पोर - ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - पोर

ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या ।

बोलणे अवघे वोखट्या । हित नाही ॥१॥

आपुले हित तू पाही । वेदशास्त्री काही नाही ।

पुराणे पढोनि केले काही । हित नाही ॥२॥

कामक्रोधे शरीर भरले । ज्ञान वैराग्य हारपले ।

बोलसी विषयाच्या बोले । हित नाही ॥३॥

आपुले हित करी काही । सद्‌गुरुसी शरण जाई ।

'मी-तू' पणा नुरे काही । हित पाही ॥४॥

एका जनार्दनी पोर । केला सारासार विचार ।

पावला सद्‌गुरद्वार । हित जाले ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:32:17.0000000Z

Comments | अभिप्राय