HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड सर्प वासुकी सर्प मोठा दारूण । भारुड सौरी सौरी झाले बाई आत करू गत क
भारुड - सौरी - मी सुखाची कन्यका झाले वाढ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - सौरी

मी सुखाची कन्यका झाले वाढविली घरी ।

देखता पाहता उचलून उचलून नेली चोरी ॥ १ ॥

सौरी झाले बाई आता करू तरी काई ॥ धृ. ॥

निसुगाचा पुत्र झाला जावा नणंदा घरी ॥

पाहतां देखतां उचलून उचलून नेली चोरी ॥ २ ॥

बारा सोळा मुले झाली आले सुना नातू ।

कंबरेवरी हातू ॥ ३ ।

कैची बहीण कैची माय अंतकाळी देखा ।

निदानीचे वेळी तुज देव मारी हाका ॥ ४ ॥

लेकुरवाळी बाईल म्हणे तोंड यांचे झाका ।

एका जनार्दनी म्हणे भवीं भुलू नका ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:39:08.0000000Z

Comments | अभिप्राय