HOME|mr|sahitya|bharude|
भारुड सौरी मी सुखाची कन्यका झाले वाढ भारुड  वाघ्या अहं वाघा साहं वाघा प्रेमन
भारुड - सौरी - सौरी झाले बाई आत करू गत क...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - सौरी

सौरी झाले बाई आत करू गत काई ।

बसवी झाले बाई आता भिन्नभेद नाही ॥ १ ॥

कासरा लावून सासरा दादला टाकून आले ।

आत्मलिंग पाहूनिया मदनमस्त झाले ॥ २ ॥

बांधून बुचडा उघडा माथा विभुतीचा पट्टा ।

आला गेला म्हटला नाही धरल्या चारी वाटा ॥ ३ ॥

उभी शिंदळ घाली गोंधळ हाचि लाभ मोठा ।

मागे पुढे पाहू नका वेगी काम लाटा ॥ ४ ॥

लहान थोर म्हटला नाही जाहले मी वेडी ।

एका जनार्दनी बसवी झाले परद्वार गोडी ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:40:05.0000000Z

Comments | अभिप्राय