HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड  वाघ्या अहं वाघा साहं वाघा प्रेमन भारुड  वासुदेव जया परमार्थी चाड । तेणे स
भारुड - वासुदेव - कर जोडोनि विनवितो तुम्हां...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



45GOOG
भारुड - वासुदेव

कर जोडोनि विनवितो तुम्हां । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ।

नको गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१॥

नरदेह दुर्लभ जाणा । शतवर्षांची गणना ।

त्यामध्ये दु:ख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२॥

नलगे तीर्थांचे भ्रमण । नलगे दंडण मुंडण ।

नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३॥

हेचि माझी विनवणी । जोडितो कर दोन्ही ।

शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:43:33.0000000Z

Comments | अभिप्राय