HOME|mr|sahitya|bharude|
भारुड  वासुदेव सुखे सेऊं ब्रह्मानंदा । ग भारुड वेणु अधरी धरूनि वेणु ।  वेणु
भारुड - वटवाघूळ - पूर्वी पंक्‍तिस केला भेद ...


भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 



30GOOG
भारुड - वटवाघूळ

पूर्वी पंक्‍तिस केला भेद । नाही अंत:करण शुद्ध

झाले वटवाघूळ प्रसिद्ध ॥ १ ॥

वटवाघूळझाले बाई । करावे काई । उपाय नाही ॥ धृ. ॥

वटवाघळीचा जन्म घेऊन । घेतले उफराटे टांगून ।

तोंडी नरक भरला जाण ॥ २ ॥

वटवाघळीची यातना मोठी । भोगिल्या चौर्‍यांशी कोटी ।

जन्ममरणाच्या तुटल्या गाठी ॥ ३ ॥

एकाजनार्दनी वटवाघूळ झाले । सद्‍गुरुला शरण गेले ।

जन्ममरण चुकविले ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-13T19:50:22.0000000Z

Comments | अभिप्राय