HOME|mr|sahitya|gaani|gadima|01|
गदि माडगूळकर संग्रह १ गदिमा हे राष्‍ट्र देवतांचे हे
गदिमा - एक सूर, एक ताल, एक गाऊ वि...


ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.



30GOOG
जय जवान, जय किसान

एक सूर, एक ताल, एक गाऊ विजयगान !

जय जवान, जय किसान !!

अखिल देश पाठिशी, ’जवान’ व्हा रणी चला

किसान होऊनी कसा, भूमि सस्य श्यामला

यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान

जय जवान ॥१॥

शत्रु मित्र जाणुनी, सावधान सर्वदा

आपुल्या श्रमे करु, प्रसन्न देवि अन्नदा

उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान !

जय जवान ॥२॥

अजिंक्य सैन्य आमुचे, गाजवी पराक्रमा

भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा

स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान ।

जय जवान ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
30GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T13:03:36.4215296Z

Comments | अभिप्राय