HOME|mr|sahitya|gaani|kusumagraj|02|
माळाचे मनोगत उमर खैयाम
ऋण


’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.



54
ऋण

पदी जळत वालुका वर उधाणलेली हवा

जळास्तव सभोवती पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा श्रमुनि येतसे पावला

तुम्हीच कवी हो, दिला मधुरसा विसावा मला !

अहो उफळला असे भवति हा महासागर

धुमाळुनि मदान्ध या उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी गवसता किती तारवे

प्रकाश तुमचा पुढे बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही उजळ ज्योति या लावता

असाल कढला असे, प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली रुधिर-वाहिनी रोधुनी

असेल तुम्हि ओतली स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी प्रगट स्मारकांची दळे

असंख्य ह्रदयी उभी असत आपुली देवळे !

Translation - भाषांतर

N/A
54
References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३६



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-25T00:40:32.5392768Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us