HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह २|
बंदी बायरन
आव्हान


’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.



50GOOG
आव्हान

बलवन्ता, आव्हान

बळीचे बलवन्ता, आव्हान

असेच चालू दे चहुकडुनी अखण्ड शरसंधान् !

रक्ताने न्हाली

तनू ही रक्ताने न्हाली

आणि चाळणी जरी छातिची पिंजुनिया झाली

काळजात उठती

कळा जरि काळजात उठती

बळी गिळाया घारगिधाडे घोटाळत वरती !

लवहि न आशंका

परन्तू लवहि न आशंका

समर पुकारित राहिल नित हा रणशाली डंका !

बुरुजावरति निशाण्

उभे हे बुरुजावरति निशाण

किरीट उज्जवल चढो शिरावर वा होवो शिरकाण !

Translation - भाषांतर

N/A
50GOOG
References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - पुणे

सन - १९३८


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-25T01:01:38.3394080Z

Comments | अभिप्राय