HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह ३|
भाव कणिका निर्माल्य
ध्यास


’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.



46GOOG
ध्यास

चांदण्याचा झोत झरे नभातून

माझ्या मनातून ध्यास तुझा.

निर्झराचा नाद घुमे पहाडात

माझ्या अन्तरात हाक तुला

जुन्या देवळात उजळते वात

माझ्या जीवनात प्रीति तुझी.

निळ्या आभाळात पाखरांचे थवे

वेडी माया धावे तुझ्याकडे.

निशी स्मशानात रात्रिचर रडे

उरी धडधडे तुझ्यासाठी.

Translation - भाषांतर

N/A
46GOOG
References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३२


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-25T01:27:19.2551360Z

Comments | अभिप्राय