HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह ३|
ध्यास जीवन लहरी
निर्माल्य


’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.



18GOOG
निर्माल्य

होता मोहरला वसन्त वितरी मार्गावरी तो फुले

होते धुन्द सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,

स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर

आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा

झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा

मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी

वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस

डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !

जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,

गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,

पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !

Translation - भाषांतर

N/A
18GOOG
References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३३


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-25T01:29:21.1103552Z

Comments | अभिप्राय