HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
डोळे हे जुलमि गडे तुजवीण
जगाहून भिन्न


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.



12GOOG
जगाहून भिन्न

ज्योत्स्नेनें नभ व्यापिलें, विश्व माखिलें पयें जणुं चोख

ह्रदयांत भरे काळोख.

नभिं नक्षत्रें चमकती, रत्‍नमणि किती विखुरले दिसती,

कोळसे तरंगति चित्तीं.

वर्षतो सुधा शीतला, निववि भूतला चंद्र या समयीं,

काळकूट भडके ह्रदयीं.

शीत हा पवन संचरे, सुवासें भरे व्योम हें सारें,

निःश्‍वास ऊन मी वितरें.

सलिलांत फुले कमलिनी मृदुल जी जनीं, मनीं परि भरती

ते तरंगकंटक रुतती.

प्रियसखी-वियोगामुळें ह्रदय हो खुळे जगाहुनि भिन्न

तें चूर सुखीं, हें खिन्न !

Translation - भाषांतर

N/A
12GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - मदनमंजरी

ठिकाण - देवास

साल - १८९१


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-29T23:27:27.3065168Z

Comments | अभिप्राय