HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
मार्गप्रतीक्षा पुंगीवाला
चिंवचिंव चिमणी


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.



38GOOG
चिंवचिंव चिमणी

चिंवचिंव चिमणी छतांऽत छतांऽत.

अरसा लोंबे भिंतीला भिंतीला.

चिमणी पाहे सवतीला सवतीला.

भरभर आली रागांत रागांत.

पहिली :- 'चिउताइ चिउताइ, काय बघतां ? "

दुसरी :- "टच् टच् चिउताइ, काय करितां ? काय करितां ?"

तिसरी - 'ती तर तुमची पडछाया पडछाया

चवथी :- उगीच शिणतां कां वाया कां वाया ?

पहिली:- "फुटेल काच."

दुसरी:- "दुखेल चोच."

तिसरी:- "पडेल खोऽच चोचीला चोचीला

चवथी:- 'काऽय होइल सवतीला सवतीला"

सर्वजणी:- 'टाळ्या वाजवुं या चटचट् या चट्‌चट्

पावलें फिरवूं या पट्‌पट् या पट्‌पट्

भुर्रऽ चिमणी उडाऽली उडाऽली.

छतांत जाउनि दडाऽली दडाऽली."

Translation - भाषांतर

N/A
38GOOG

कवी - भा. रा. तांबे

ठिकाण - देवास

साल - १८९३


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-29T23:30:50.5587792Z

Comments | अभिप्राय